विधानसभा इच्छुकांची दिवसभर धावपळ; ठिकठिकाणी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी

Foto
औरंगाबाद: लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले.  यावेळी लोकसभेच्या उमेद्वारापेक्षा जास्त विधानसभा इच्छुक व आजी-माजी आमदारांची दिवसभर धावपळ सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीचा फिवर चढला होता. प्रचारफेऱ्या, रोड शो, सभा, कॉर्नर बैठका असे चित्र गेल्या काही दिवसात सतत पहायला मिळाले. अखेर मंगळवारी मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे 63 टक्के मतदानाची नोंद शासकीय स्तरावर करण्यात आली. निवडणूक लोकसभेची असली तरी लोकसभेच्या उमेदवारांपेक्षा अधिक धावपळ विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार, आजी - माजी आमदारांची पाहायला मिळाली. लोकसभा निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून हे सर्व चांगलेच ॲक्टिव झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सकाळपासूनच हे इच्छुक व आजी - माजी आमदार शहरातील विविध भागात फेरफटका मारताना दिसून आले. यावेळी त्यांनी बुथवरील आपल्या जुन्या कार्यकर्त्यांसह, नव्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यात भाजपचे विद्यमान आमदार अतुल सावे, माजी आमदार राजेंद्र दर्डा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, जितेंद्र देहाडे आदींचा समावेश होता. अतुल सावे हे पूर्व मधून पुन्हा विधानसभेत जाण्याचा प्रयत्नात आहे.  माजी आमदार असलेले दर्डा, पवार यांच्यासह देहाडे देखील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. त्या अनुषंगानेच त्यांची ही धावपळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker